Zakir Khan New Show | लोकप्रिय कॉमेडियन झाकीर खान लवकरच टीव्ही शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उत्तम कॉमेडी टायमिंग आणि संवाद कौशल्याने झाकीरने स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. लवकरच त्याचा ‘आपका अपना झाकीर’ हा शो सोनी एन्टरटेनमेंट टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या नव्या कार्यक्रमाचा टीजर शेअर करण्यात आला आहे. ओटीटी, लाईव्ह शो, सोशल मीडियाच्या माध्यमातून झाकिरने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता तो थेट टीव्ही शोच्या माध्यामातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
‘आप देखेंगे, हम देखेंगे, सब देखेंगे’ असे कॅप्शन देत या कार्यक्रमाचा टीजर शेअर करण्यात आला. टीजरमध्ये दिसते आहे की गळ्यात फुलांचे हार घातलेले झाकीरचे मोठे कटआऊट रस्त्याच्या कडेला उभारले जात आहे. मात्र हा कार्यक्रम कधीपासून आणि कोणत्या वेळेत सुरू होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
View this post on Instagram
याच वाहिनीवर कॉमेडी किंग कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो प्रेक्षक पाहत होते. या कार्यक्रमाच्या जागी आता झाकिर खान प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. त्यामुळे कपिल शर्माची जागा आता झाकिर खानने घेतली असल्याचं म्हटले जात आहे. Zakir Khan New Show |
दरम्यान, झाकिरच्या कॉमेडीचा देखील मोठा चाहतावर्ग आहे. झाकिरची स्टँडअप कॉमेडी मोठ्या प्रमाणात पसंत मिळते. शिवाय सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. २०१२ मध्ये झाकिरने कॉमेडी सेंट्रल हा कार्यक्रम जिंकून लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर आता नव्या शोच्या माध्यमातून झाकिरच्या कॉमेडीची कमाल अनुभवता येणार आहे. Zakir Khan New Show |