अलीकडेच ‘बिग बॉस 9’ चे विजेते प्रिन्स नरुला आणि त्याची पत्नी युविका चौधरी प्रेग्नेंट असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती मात्र आता खुद्द प्रिन्सने या अफवांचे खंडन केले आहे.
तो म्हणतो की युविका गरोदर नाही, ती असती तर तिने स्वतःच सांगितले असते. इतकंच नाही तर अफवा पसरल्यानंतर युविका आरती सिंह आणि दीपक चौहान यांच्या संगीत सोहळ्यात दिसली.
प्रिन्स नरुला यांनी पत्नी युविका चौधरीच्या प्रेग्नसीच्या चर्चांचे खंडन केले त्याने सांगितले की, ‘मला माहित नाही की अशा अफवा कुठून येतात. बातमी वाचून आमच्या घरी हसू आलं. मला हे स्पष्ट करायचे आहे की युविका गर्भवती नाही. खरे तर तसे झाले असते तर ते आम्ही सांगितले असते.’
प्रिन्स आणि युविकाची प्रेमकहाणी ‘बिग बॉस 9’ मध्ये सुरू झाली होती. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला ६ वर्षे झाली आहे.
युविकाबद्दल बोलायचे झाले तर तिने शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ चित्रपटात काम केले आहे. ‘बिग बॉस 9’ व्यतिरिक्त ती ‘नच बलिये 9’ या डान्स शोमध्येही दिसली आहे. तिने पती प्रिन्ससोबत या शोमध्ये भाग घेतला आणि ती विजेतीही ठरली. प्रिन्सबद्दल बोलायचे झाले तर, ‘बिग बॉस 9’ व्यतिरिक्त, तो ‘MTV रोडीज X2 आणि स्प्लिट्सविला 8’ चा विजेता देखील आहे.