तळेगाव दाभाडे, (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 24) दुपारी दीड वाजता सुशीला मंगल कार्यालय, लिंब फाटा, तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.
मोहित उर्फ बंटी महेंद्र आगळे (वय 26, रा. तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे यांनी सोमवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यासमोर असलेल्या लिंब फाटा येथील सुशीला मंगल कार्यालयात येथे एक तरुण पिस्तुल घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन मोहित याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे एक पिस्तुल आणि 2 हजार रुपये किमतीची दोन काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.