Wimbledon Open 2024 : वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम विम्बल्डनमध्ये भारताची चांगली झाली नाही. भारताची सर्वात मोठी आशा, अव्वल एकेरी टेनिसपटू सुमित नागलला पहिल्या फेरीतच निराशा हाती आली. भारतीय स्टारने 44 सोप्या चुका केल्या आणि पहिल्या फेरीत सर्बियाच्या मियोमिर केकमानोविचविरुद्ध चार सेटच्या पराभवासह विम्बल्डन स्पर्धेतून बाहेर पडला. पुरुष एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या नागलला सोमवारी रात्री दोन तास 38 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 2-6, 6-3, 3-6, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला.
WIMBLEDON: SUMIT NAGAL GOES DOWN AFTER A TOUGH FIGHT
On his Wimbledon debut, @nagalsumit gave a good account of his himself on his least favorite surface, eventually losing to 53rd ranked Miomir Kecmanovic 🇷🇸 2-6 6-3 3-6 4-6
Nagal, a heavy underdog going into the match, was… pic.twitter.com/ghL4QZUAKK
— Indian Tennis Daily (ITD) (@IndTennisDaily) July 1, 2024
नागलने जागतिक क्रमवारीत 53व्या स्थानावर असलेल्या केकमानोविचविरुद्ध एक सेट जिंकला. क्रमवारीत 72व्या क्रमांकावर असलेल्या 26 वर्षीय भारतीय खेळाडूने 47 विनर लगावले पण एकूणच त्याला ग्रास कोर्टवर संघर्ष करावा लागला. शेवटी केकमानोविचच्या 122 गुणांच्या तुलनेत नागलला केवळ 104 गुण मिळू शकले. सर्बियन खेळाडूने सहा एसे लगावले आणि फक्त दोन डबल फॉल्ट केले. केकमानोविचचा नागलविरुद्ध दोन सामन्यांतील हा दुसरा विजय आहे. चार वर्षांपूर्वी जर्मनीतील कोलोन येथे झालेल्या एटीपी 250 स्पर्धेतही त्याने नागलचा पराभव केला होता.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला नागल पाच वर्षांत विम्बल्डन पुरुष एकेरीचा मुख्य ड्रॉ सामना खेळणारा पहिला भारतीय आहे. प्रजनेश गुणेश्वरन 2019 मध्ये पहिल्या फेरीत बाहेर पडला होता.
Wimbledon Open 2024 : गतविजेत्या कार्लोस अल्कराजची विजयी सलामी…
नागलचा सध्याचा हंगाम उत्कृष्ट राहिला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉसाठीही तो पात्र ठरला होता. त्याने पहिल्या फेरीत कझाकस्तानच्या 31व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला होता आणि ग्रँड स्लॅममध्ये सीडेड खेळाडूला पराभूत करणारा 35 वर्षांतील पहिला भारतीय पुरुष टेनिसपटू बनला होता.