Sharad Pawar । विधानसभा निवडणुकीसाठी मविआकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. या मागणीमुळे महाविकास आघाडीत वातावरण तापणार आहे. या मागणीत राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचीच अप्रत्यक्ष मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. महायुतीतील इतर घटक पक्षाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले,’आम्ही सामुहिकपणे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे. त्यावर पत्रकारांनी पुढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात का? असे विचारले असते ते पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही सामुहिकपणे मुख्यमंत्री पदाचा चेहर असू.’ असेही त्यांनी सांगितलं
दरम्यान, शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अनेक टोले लगावले. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत मोदींची गॅरंटी फेल गेली. त्यांनी महाराष्ट्रात जिथे सभा घेतल्या तिथे जवळपास सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्यावात.”