पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याची मला महत्वपुर्ण सुवर्णसंधी लाभली, अग्निशमन विभागात फायरमन म्हणून सुरु केलेला प्रवास अतिरिक्त आयुक्त पदापर्यंत येऊन पोहोचला.
या प्रवासात शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी तसेच कर्मचार्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या प्रवासात कुटुंबियांनी देखील मोलाची साथ लाभली. समाजकार्याचे घेतलेले व्रत सेवानिवृत्तीनंतर देखील अविरतपणे सुरू ठेवून लोककल्याणासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त झालेले पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्यासह एकूण 50 अधिकारी आणि कर्मचार्यांचा सत्कार सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाला. या सत्कार समारंभास पालिकेचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्यांचे नातेवाईक उपस्थित होते
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार्या कर्मचार्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, कार्यकारी अभियंता रामनाथ टकले, अकबर शेख, कार्यालय अधिक्षक रमेश चोरघे, लेखापाल पुनमचंद बलदोटा, मुख्याध्यापक शशिकांत गायकवाड, मुख्याध्यापिका माधुरी लवटे, शितल काकडे, सविता केसकर, सफिया शेख, मुख्य लिपीक रमेश लांडगे,
सुनील काळदंते, विकास शिंदे, उषा माने, उपलेखापाल संजय काळभोर, सिस्टर इन्चार्ज शोभा भारती, सीमा मोरे, स्टाफ नर्स, प्रतिभा गोडसे, सुरेखा समुद्रे, कनिष्ट अभियंता सुभाष राठोड, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शिवकुमार ग्वालवंशी, वीज पर्यवेक्षक दिलीप गुंजाळ, सहाय्यक उद्यान निरीक्षक गोपाळ खैरे, लिपीक गणेश पौनिकर, सहाय्यक शिक्षक मधुकर भिसे, विशेष शिक्षक राजू भगत,
उपशिक्षक सीमा पंडित, बाबूराव लांघी, वसुंधरा कुलकर्णी, सुतार राजेंद्र हात्ते, प्लंबर बाळू चिव्हे, वाहनचालक किशोरकुमार शितोळे, मुकादम लहू पंचरास, शिपाई भीम निकाळजे, बिभीषण सपकाळ, शिवाजी गव्हाणे, राजकुमान साबळे, वॉर्डबॉय ज्ञानेश्वर काटे, मजूर सुरेश जगताप, रमेश पवार, नंदू कंपिले, किसन वाघेरे, बाबू फुगे, यशवंत मोहिते, रखवालदार साहेबराव जाधव, रामचंद्र भागीत, सफाई कामगार भानुदास बनकर, बेबी लोखंडे, नंदा ओव्हाळ यांचा समावेश आहे.