Nordic countries | happiest countries : 2013 पासून ते 2024 पर्यंत जागतिक आनंदी देशांच्या अहवालात नेहमीच नॉर्डिक कंट्रीज म्हणजेच उत्तर युरोपातील फिनलँड डेन्मार्क नॉर्वे स्वीडन आइसलँड हे नेहमीच पहिल्या दहा देशांमध्ये स्थान पटकावत आहेत.
आता प्रश्न असा पडतो, की या नॉर्डीक देशांमधील नागरिक इतके समाधानी आणि आनंदी कसे काय असतात? वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट मधील आकडेवारीनुसार त्यांच्या आनंदा असण्यामागे त्या देशांमधील चांगल्या संस्था, कल्याणकारी फायदे आणि अत्यल्प भ्रष्टाचार ही प्रमुख कारणे दिसून येतात.
माणूस आनंदी असणे, एखाद्या देशातील माणसे मोठ्या संख्येने आनंदी असणे हे सगळे समजून घेणे किंवा ही संकल्पना मांडणे आणि या सगळे आकडेवारीत बसवणे आणि पुन्हा त्यांची क्रमवारी लावणे हे अतिशय कठीण काम असते. मात्र वर उल्लेख केलेल्या तीन प्रमुख मुद्द्यांमुळे नॉर्डिक प्रदेशातील देश हे नेहमीच वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट मध्ये पहिल्या दहा देशांमध्ये स्थान मिळवताना दिसतात.
आनंदी देशांचा शोध घेण्यासाठी जवळजवळ 146 देशांमध्ये विविध व्यक्तींच्या मुलाखती आणि विश्लेषण तसेच अन्य आकडेवारीचा अभ्यास करून 2024 साठी ची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात आनंदी लोकांचा देश म्हणून फिनलंडला स्थान मिळालेले आहे. सर्व निकषांवर या यादीत पहिले स्थान मिळवताना फिनलंडने 7741 गुण मिळवलेले आहेत.
सांताक्लॉज ज्या देशाला स्वतःचे घर मानतो तो देश म्हणजेच फिनलंड. या देशाला सांताक्लॉजचे घर मानले जाते. त्यामुळे तो देश स्वाभाविकपणे सर्वाधिक आनंदी व्यक्तींच्या यादीत अग्रभागी येऊ शकतो. अशाप्रकारे नॉर्डिक देश हे सलग सातव्या वर्षी या यादीत पहिल्या दहा देशांमध्ये आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 7583 गुण मिळवून डेन्मार्क आहे. तिसऱ्या क्रमांकावरील आइसलँड ने 7525 आणि चौथ्या क्रमांकावरील स्वीडनने 7344 गुण मिळवलेले आहेत. या तुलनेत नॉर्वे किंचितसा मागे पडलेला आहे. हा देश 7302 गुण मिळवून सातव्या स्थानावर आहे.
आनंद कसा मोजला जातो?
अर्थातच या सर्व प्रक्रियेसाठी काही निकष निश्चित करण्यात आले असून अन्य काही घटकही विचारात घेतले जातात. जागतिक आनंदी अहवाल तयार करताना सर्व देशांसाठी सहा प्रमुख निकष लावले जातात. त्यामध्ये त्या देशाचे प्रतिव्यक्ती सकल देशांतर्गत उत्पादन(जीडीपी), मदत करण्याची प्रवृत्ती, कसे जगावे याची निवड करण्याचे स्वातंत्र्य,
भ्रष्टाचाराविषयीचा दृष्टिकोन, निरोगी दीर्घायुष्य आणि सामाजिक पाठबळ यांचा समावेश आहे. या संदर्भातील आकडेवारी गोळा करताना संबंधित काम करणाऱ्या संस्था ओपिनियन पोल घेऊन माहिती गोळा करतात. अर्थातच ही मते सर्व देशांमधून घेऊन त्या आधारे अहवाल तयार केला जातो.
वस्तुस्थिती अशी आहे, की वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टमुळे प्रत्येक देशाला स्वतःचे मूल्यमापन करण्याची संधी उपलब्ध होते. वर उल्लेख केलेल्या सहा मुद्द्यांपैकी कोणत्या मुद्द्यांवर आपल्या देशात सुधारणा करण्याची गरज आहे, याचा अंदाज येतो. त्याखेरीज आपल्या देशातील नागरिकांचा आनंद विषयीचा दृष्टिकोनात सुधारणा कशी होईल यासाठी देखील या अहवालाचा उपयोग होतो.
अगदी कोरोनासारख्या जागतिक साथीच्या काळातील घटनाही या अहवालांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत. साथीच्या काळात निश्चितपणे जगभरातील आनंदी पणाची भावना कमी झाली होती आणि दुसरीकडे एकी, सामाजिक पाठबळ या गोष्टींना अतिशय महत्त्व निर्माण झाले होते. नॉर्डिक देशांचा विचार केला तर या देशात अतिशय थंड हवामान आहे. बहुतेक देशांमध्ये बर्फवृष्टी होते.
त्यामुळेच तेथील लोक जास्त आनंदी असतात असे वाटू शकते. मात्र वस्तूस्थिती फारच वेगळी आहे. तज्ञांच्या मते, लोक हवामानाशी जुळवून घेतात. त्यामुळे हवामानाचा आनंदी असण्याशी आणि नसण्याशी फारसा परिणाम होत नाही, हे आपल्याला नॉर्डिक प्रदेशातील लोकांवरून दिसून येते. असाही एक गैरसमज आहे, की या देशांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे.
अर्थात 1970 ने 80 च्या दशकांमध्ये या देशांमधील आत्महत्यांचे प्रमाण जास्त होते. मात्र, गेल्या काही वर्षात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत गेलेली दिसते आणि आता साधारणपणे अन्य युरोपियन देशांमध्ये होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण आणि नॉर्डिक देशांमधील आत्महत्यांचे प्रमाण साधारण बरोबरीला आह.
नॉर्डिक प्रदेशातील देशांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची आणि दर्जेदार अशी शिक्षण पद्धती उपलब्ध आहे. त्याखेरीज त्यांच्याकडे सामाजिक सेवांचा म्हणजेच नागरिकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक सेवांचा दर्जा अतिशय उच्च असतो. या देशांमध्ये उच्च प्रतीचे स्वातंत्र्य आणि समानता आढळून येते.
त्याचबरोबर लोकांमध्ये औदार्याची भावनाही आढळते. त्यामुळेच हे देश पृथ्वीच्या पाठीवरील सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान मिळवून आहेत. 2024 च्या सर्वाधिक आनंदी देशांच्या यादीमध्ये फिनलंड डेन्मार्क यांच्या पाठोपाठ आइसलँड, स्वीडन, इस्रायल, नेदरलँड, नॉर्वे, लक्झेंबर्ग, स्विझर्लंड आणि ऑस्ट्रेलिया ही नावे पहिल्या दहा मध्ये आहेत.
11 ते 20 क्रमांकामध्ये न्युझीलँड, कोस्टारिका, कुवेत, ऑस्ट्रिया, कॅनडा, बेल्जियम, आइसलँड, झेक प्रजासत्ताक, लिथूआनिया आणि युनायटेड किंगडमचा समावेश होतो. या यादीत सर्वात दुःखी देश म्हणून लेसोथो, लेबानन आणि अफगाणिस्तान चा समावेश होतो