Monsoon Session 2024 । उद्या २७ जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. येत्या अधिवेशनात महाविकास आघाडी राज्यातील अनेक मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये शेतकरी कर्जमाफी, बोगस बियाणे, जास्त दरात बियाणे विक्री, मराठा- ओबीसी आरक्षण वाद, शक्तीपिठ महामार्ग शेतकरी विरोध, दुष्काळ अशा सर्व मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यात शतेकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असताना सरकार गंभीर नसल्याचं सांगत विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला आहे.
Monsoon Session 2024 । पावसाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार –
– शेतकरी कर्जमाफी
– दुधाला कमी भाव
– नीट परीक्षा रद्द
– कांदा प्रश्न
– घाटकोपर होर्डींग्ज दुर्घटना
– बोगस बियाणे
– जास्त दरात बियाणे विक्री
– बेरोजगारी
– अटल सेतू भेगा
– शेतकऱ्याला मदत न करणे
– शेतकरीला पीक कर्ज न देणे
– कायदा सुव्यवस्था
– पोलिस भरती रद्द
– परीक्षा घोळ
– शक्तीपिठ महामार्ग शेतकरी विरोध
– मराठा- ओबीसी आरक्षण वाद
– पेपर फुटी
– पुणे हिट अँड रन जामीन प्रकरण
– महागाई
– इतर ही मुद्दे महत्त्वाचे असणार आहे.
– पुण्यातील अंमली पदार्थ
– कापूस सोयाबीनचे कोसळलेले भाव
– पावसाचा खंड पडल्याने राज्यात निर्माण झालेली परिस्थिती