Entertainment | अभिनेता विकी कौशलच्या खात्यात अनेक मोठे चित्रपट आहेत. सध्या तो ज्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे ते म्हणजे छावा. यात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. यानंतर तो संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्येही दिसणार आहे.
View this post on Instagram
त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. पण या चित्रपटांपूर्वीच त्याचा बॅड न्यूज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. यात विकी कौशलसोबत तृप्ती डिमरी आणि एमी विर्क दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील तिघांचेही पोस्टर समोर आले आहे, ज्यामध्ये ते अप्रतिम दिसत आहेत.
विकी कौशलचा हा चित्रपट १९ जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तर या चित्रपटाचा ट्रेलर 28 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच करण जोहरने इंस्टाग्रामवर बॅड न्यूजचे तीन नवीन पोस्टर शेअर केले आहे. त्यात विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क दिसत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘या त्रिकुटाला भेटा, जे या वर्षी बॅड न्यूज घेऊन येत आहे. यादरम्यान, तीन पात्रांची नावे देखील समोर आली, अखिल चड्ढा, सलोनी आणि गुरबीर पाजी.’ या चित्रपटात विकी आणि तृप्ती पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे त्यामुळे प्रेक्षकही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.