Ayodhya ,Faizabad । Lok Sabha Result 2024 – अयोध्या जिल्ह्यातील फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. रामनगरीमध्ये विरोधी आघाडीचे उमेदवार आणि सपा नेते अवधेश प्रसाद यांनी चुरशीच्या लढतीत सुमारे ५४ हजार मतांनी विजय मिळवला. या बातमीची देशभर चर्चा सुरु आहे. फैजाबादमध्ये राम मंदिराच्या उभारणीनंतर येथे पहिली लोकसभा निवडणूक झाली आणि त्यात भाजपला अपयश आले.
लोकसभेचे 80 खासदार उत्तर प्रदेशमधून निवडून आले आहेत. फैजाबाद ही ८० लोकसभा जागांपैकी एक आहे. १९५१-५२ मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी फैजाबाद ही जागा नव्हती. १९५६ – दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकांवेळी फैजाबाद नावाची लोकसभा जागा अस्तित्वात आली. या मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात.
दर्यााबाद, रुदौली, मिल्कीपूर (एससी), बिकापूर आणि अयोध्या हे विधानसभा मतदारसंघ आहेत. मिल्कीपूरखेरीज उर्वरित चार जागांवर भाजपचे आमदार आहेत. मिल्कीपूरचे एकमेव सपा आमदार आता फैजाबादमधून खासदार झाले आहेत. फैजाबादमध्ये सुरुवातीला काँग्रेसचा विजय झाला. १९५७ – काँग्रेसचे पन्नालाल आणि राजा राम यांना यश मिळाले. यापैकी एक सर्वसाधारण प्रवर्गातील आणि एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा होता.
- १९६२ – काँग्रेसचे ब्रिज बसीलाल
- १९६७ – काँग्रेसचे रामकृष्ण सिन्हा
- १९७१ – काँग्रेसचे रामकृष्ण सिन्हा
- १९७७ – भारतीय लोकदलाचे अनंत राम जैस्वाल
- १९८० – काँग्रेसचे जय राम वर्मा
- १९८४ – काँग्रेसचे निर्मल खत्री
- १९८९ – मार्क्सवादी कञुनिस्ट पक्षाचे मित्र सेन
- १९९१ – भाजपाचे विनय कटियार
- १९९६ – भाजपाचे विनय कटियार
- १९९८ – समाजवादी पक्षाचे मित्रसेन यादव
- २००४ – बसपाचे मित्रसेन यादव
- २००९ – काँग्रेसचे निर्मल खत्री
- २०१४ – भाजपचे लल्लू सिंह
- २०१९ – भाजपचे लल्लू सिंह
- २०२४ – समाजवादी पक्षाचे अवधेश प्रसाद