वॉशिंग्टन । आजही जगात अनेक विशाल साम्राज्य आहेत.आधुनिक काळातही अनेक सम्राट नावापुरते का होईना अस्तित्वात आहेत. पाम साम्राज्य म्हटले कि ते मोठे असणार असा एक समज आहे, पण जगातील सर्वात लहान अशा एका साम्राज्यामध्ये केवळ 11 जण राहतात आणि तेही वर्षातील काही दिवस आणि दिवसातील काही तास. हे आगळे असं साम्राज्य आहे किंगडम ऑफ टवोलारा. याठिकाणी असा राजा आहे जो स्वतः प्रवासी वाहतुकीसाठी बोट आणि रेस्टॉरंट चालवतो. हाफ पँट आणि सँडल परिधान करून तो जीवन जगतोय. भूमध्य सागरामध्ये इटलीच्या सार्डीनिया प्रांताजवळ असलेलं हे एक छोटंस बेट आहे. याठिकाणी हे साम्राज्य आहे. इटलीला देश म्हणून मान्यता मिळण्याच्या पूर्वीपासून ते अस्तित्वात आहे. किंगडम ऑफ टवोलारा हे प्रत्यक्षात टवोलारा नावाच्या एका छोट्याच्या बेटावर वसलेलं आहे.
याचं एकूण क्षेत्रपळ हे पाच चौरस किलोमीटर एवढं आहे. या साम्राज्याच्या राजाचं नाव आहे, आंतोनियो बर्तलिओनी.पण ते राजासारखे दिसतच नाही. पेहराव किंवा राहणीमान काहीही तसं नाही. आंतोनियो बर्तलिओनी म्हणतात की, राजा म्हणून त्यांना केवळ जेवण मोफत मिळतं. तेही त्याच्या स्वतःच्या रेस्टॉरंटमधून.5 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या या देशात एकूण 11 नागरिक आहेत. इथले राजा आंतोनियो हेच इथं असलेलं एकमेव रेस्टॉरंट चालवतात.किंग्डम ऑफ टवोलारामध्ये यंदा स्थापनेला 180 वर्ष पूर्ण झाल्याचा उत्सव साजरा होत आहे.एंतोनियो बर्तलिओनी यांच्या मते त्यांच्या पणजोबांचे पणजोबा, गुसेप बर्तलिओनी 1807 मध्ये दोन बहिणीशी लग्न करून इटलीमधून पळून आले होते. त्यावेळी इटली हा देश नव्हता, तर सार्डिनिया हा इटलीचा एक भाग वेगळं साम्राज्य म्हणून कारभार चालवत होता. याठिकाणी दोन विवाह करणं हा गुन्हा होता. त्यामुळं गुसेप बर्तलिओनी पळून या बेटावर आले आणि तिथंच स्थायिक झाले.
एकोणीसव्या शतकात ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांनी जगभरातील राजांचे फोटो गोळा करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी टवोलारा मधल्या शाही कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी एक जहाज इथंही पाठवलं होतं. त्यानंतर अनेक वर्ष इंग्लंडच्या बकिंघम पॅलेसमध्ये हा फोटो होता. सध्या हा फोटो एंतोनिओ बर्तलिओनी यांच्या रेस्तरॉमध्ये लावलेला आहे. तसं पाहिलं तर टवोलाराला जगातील कोणताही देश मान्यता देत नाही. टवोलाराचे राजा आंतोनियो आणि त्यांच्या कुटुंबातील लोक इटलीपासून या बेटापर्यंत पर्यटकांची ने आण कराणाऱ्या प्रवासी बोटी चालवतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरण्यासाठी येतात. ते याठिकाणी बकऱ्या आणि गरुडांच्या एका लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातीला पाहण्यासाठी येतात.
तांत्रिकदृष्ट्या आंतोनिओ आणि त्यांचे सर्व नातेवाईक हे इटलीचे नागरिक आहेत. त्यांना एकदा असंही मनात आलं होतं की, ड्यूक ऑफ सेवॉयकडे त्यांच्या राज्याला मान्यता देण्याबाबत विचार करण्याची विनंती करावी. पण नंतर त्यांनी हा विचार सोडून दिला. आंतोनियो यांच्या मते, आमच्याकडं महाल म्हणून एवढं मोठं बेट असताना, आम्हाला त्याची गरज नाही.