सासवड, (प्रतिनिधी) – सासवड (ता. पुरंदर) येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण तसेच पुष्पवृष्टी करून सुमधुर संगीतात स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आली होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना आकर्षित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता.
शासनाच्या नियमानुसार पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी नवीन मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. तसेच गोड खाऊ दिला. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, मंजुषा चोरामले, आशा ढगे, सुरेखा जगताप, नरेंद्र महाजन उपस्थित होते.