नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसह श्री क्षेत्र पंढरपूरला जाणाऱ्या पायी दिंडीतील वारकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारचा रस्त्यावर दूध ओतून दूधदर भाववाढीसाठी छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बाभुळवेढे (ता.नेवासा) येथे मंगळवार (दि.२) रोजी दुपारी १२ वाजता रस्ता रोको आंदोलन करुन सरकारचा निषेध व्यक्त करत दुधदर भाववाढीची मागणी केली.
यावेळी आंदोलकांनी गाईच्या दुधाला ४८ रुपये प्रति लिटर तसेच म्हशीच्या दुधाला ५८ रुपये प्रतिलिटर उत्पादन म्हणून सरकारने जाहीर करावा तसेच २३ नोव्हेंबर ३० जूनपर्यंत दूध खरेदीदारांमधील भावांतर योजनेतील फरकाची रक्कम १८ रुपये प्रतिलिटर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी शरद जोशी विचार मंचाचे जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ कोतकर,संदीप गवारे,अंबादास कोरडे,दादासाहेब नाबादे,राजेंद्र शेळके,स्वप्निल कोतकर, बापूसाहेब बारगळ,एकनाथ कवडे,पंढरपूर दिंडी सोहळ्यातील वारकरी मंदाबाई राठोड,सागर कोतकर, तात्यासाहेब नवथर,संजय शेळके, या दूधदर आंदोलनात सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगर महामार्ग अडवून आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले व रस्त्यावर दूध ओतून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी पंढरपूर येथे पायी दिंडी सोहळ्यातील जाणाऱ्या कन्नड येथील शेतकरी वारकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. याप्रसंगी दूध आंदोलन शेतकरी तसेच वारकऱ्यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या व भाववाढीची मागणी केली यावेळी शेतकरी नेते अंबादास कोरडे यांनी आंदोलनाचे नेत्तृत्व केले.