राजुरी, (वार्ताहर) – ज्ञानोबा माऊली तुकाराम, पायी हळुहळू चला मुखाने हरिनाम बोला तसेच जय जय राम कृष्ण हरिच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात आळे (ता.जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री रेडा समाधी मंदिराच्या श्रीक्षेत्र आळे ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवारी (दि. 29) झाले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांणी वेद बोलविलेल्या रेडा समाधी आळे या ठिकाणी असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून दरवर्षी श्रीक्षेत्र आळे ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी निघत असते.
या वर्षी पण अतिशय उत्साहात हा दिंडी सोहळा पार पडत असून प्रस्थानाची महापूजा शिवनेर भूषण राजाराम महाराज जाधव व सुदाम महाराज बनकर, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सचिव अजित कु-हाडे, सरंपंच सविता भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आली.
रामदास महाराज सहाणे यांच्याकडे वीणा देऊन व श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होनाजी गुंजाळ तसेच पंढरपूर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष म्हतुजी सहाणे, कार्याध्यक्ष नागेश कु-हाडे यांच्या दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष अमोल भुजबळ, सचिव सुनिल जाधव, खजिनदार विलास शिरतर, धनंजय काळे, प्रसन्न डोके, व्यवस्थापक कान्हू कु-हाडे, संदीप निमसे, निलेश पिंगळे,अविनाश कु-हाडे, संतोष कु-हाडे, जीवन शिदे, पांडुरंग डावखर, संजय गाढवे,गणेश शेळके,
संदीप पाडेकर ज्ञानेश्वर गाढवे, दिनकर राहिंज, संतोष डावखर ,गणेश गुंजाळ, राजेंद्र धोंगडे, अरूण गुंजाळ आदी मान्यंवर ग्रामस्थ, तसेच वारकरी उपस्थित होते. दरम्यान, दिंडी सोहळ्याच्या प्रस्थाना अगोदर रेडा समाधी मंदिर ते आळे गाव तीन किलोमीटर अंतरावर सागर वर्पे यांनी स्वखर्चाने आकर्षक अशी रांगोळी काढली होती.
दिंडी सोहळ्याचा प्रवास
आळे, बेल्हा, पारगाव (मंगरूळ), हाजीटाकळी, रामलिंग, निमोणे, इनामगाव, दौंड, काळेवाडी, भिगवत स्टेशन, पळसदेव, वनगळी, संस्थान रांझणी देवाची, टेंभुर्णी, करकंब या गावांमध्ये मुक्काम करत मंगळवारी (ता. 16 जुलै) रोजी पंढरपूर येथे पोचणार आहे.