Vidhan Sabha । आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवशी आहे.अशात विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी हातात बॅनर घेत विधानभनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी हातात बॅनर घेत ‘एक मोदी, सब पे भारी, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. इतक्यात तिथे माविआच्या नेत्यांनी येत या घोषणावर प्रतिउत्तर दिल आहे. सरकार विरोधात विरोधकांनी महाराष्ट्रात गाजर हलवा आणि सरकार चालवा, गाजर हलवा सरकार पळवा अशी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. विधानभवनामध्ये गाजर आणून सत्ताधारी पक्षातील नेत्यांना गाजर दाखव हे आंदोलन करण्यात आले.
यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांनी देखील गाजर दाखवत सरकारवर टीका केली. ‘घ्या गाजर …घ्या गाजर, सर्व समाजाला द्या गाजर. एवढ्या वर्षात काही दिले नाही. आता काय देणार. या सरकारला सर्वांना संकटात घालवायचं आहे. गुजरात आमच्या वर गेला पण आम्ही खालती जातोय. लाज नाही वाटत यांना.’, अशी टीका आव्हाडांनी केली. यावेळी तिथे उपस्थित गोगावलेंकडे आव्हाड गाजर घेऊन केले असता गोगावले हे गाजर घेत पुढे निघून गेले दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.