Vidhan Paridhad Election 2024 । लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. 12 रोजी जुलै विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार? याची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चर्चेतच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत आकडयांचा खेळ Vidhan Paridhad Election 2024 ।
जुलैमध्ये राज्यात 11 जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. 11 जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपलं गणित पक्कं असल्याचं सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक वक्तव्यही केलंय.
विधानपरिषदेसाठी ‘या’ नावांचा केंद्राकडे प्रस्ताव Vidhan Paridhad Election 2024 ।
पंकजा मुंडे
अमित गोरखे
परिणय फुके
सुधाकर कोहळे
योगेश टिळेकर
निलय नाईक
हर्षवर्धन पाटील
रावसाहेब दानवे
चित्रा वाघ
माधवी नाईक