Upendra Limaye : अभिनेता उपेंद्र लिमयेने आपल्या कसदार आवाज आणि दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची वेगळी छाप उमटवली आहे. उपेंद्र लिमये हा चोखंदळ भूमिकांसाठी खास करून ओळखला जातो.
‘जोगवा’, ‘यलो’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ऍनिमल’ अशा विविध चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रत्येक भूमिकेला उपेंद्रने योग्य न्याय दिला आहे.
उपेंद्र लिमये यांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. त्यांनी एक नवी कोरी गाडी खरेदी केली असून ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वतः अभिनेत्यानं हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
उपेंद्र लिमये यांनी महिंद्रा कंपनीची महिंद्रा XUV700tribe ही गाडी खरेदी केली. सपत्नीक गाडी खरेदी करायला गेलेल्या उपेंद्र यांचा शोरूम मधला व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते आपल्या नव्या कोऱ्या गाडीची पूजा करताना दिसत आहेत. या गाडीची किंमत 6 ते 8 लाख रुपये आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याचा स्वतःचा असा वेगळा चाहता वर्ग आहे.