Entertainment । बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखला जातो आणि यावेळी तो असाच एक चित्रपट घेऊन आला आहे. बॅड न्यूज या चित्रपटाचा ट्रेलर 28 जून रोजी लाँच करण्यात आला, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यानच, पॅप्सने विकी कौशलला कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीबाबत विचारले, ज्याला अभिनेत्याने असे उत्तर दिले की सर्वजण अवाक झाले.
View this post on Instagram
विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाला जवळपास ३ वर्षे झाली आहे. सोशल मीडियावर अनेकदा कतरिनाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येत असतात. पण विकीने आता याचं उत्तर मीडियात दिलं आहे आणि चाहत्यांनाही त्याचं उत्तर मिळालं असेल.
बॅड न्यूज या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी, जेव्हा पॅप्सने विकी कौशलला विचारले, खरी चांगली बातमी कधी येणार आहे? यावर विकी कौशल आधी हसतो आणि नंतर उत्तर देतो. विकी म्हणतो, ‘जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हा सर्वांना सांगेन, सध्या आम्ही आणत असलेल्या वाईट बातमीचा तुम्ही आनंद घ्या, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सर्वांना सांगेन.’
दरम्यान, धर्मा प्रोडक्शनमध्ये बनलेल्या बॅड न्यूज या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. आनंद तिवारी हे बॉलीवूड अभिनेते आहेत आणि आता दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. बॅड न्यूज हा चित्रपट 19 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून त्याचा ट्रेलर सर्वांनाच आवडला आहे. या चित्रपटात विकी कौशलशिवाय तृप्ती डिमरी आणि एमी विर्क देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.