Uttar Pradesh Congress । उत्तर प्रदेशमधून काँग्रेस दुःखद बातमी समोर येत आहे. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी यांचा रस्ता अपघातात मृत्यू झालाय. गाझीपूर टोल प्लाझा मध्यरात्री हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. आशुतोष त्रिपाठी यांच्या पत्नी आणि मुलीवर बीएचयूमध्ये उपचार सुरू आहेत. पत्नी कोमात असून मुलगी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आलीय. सर्व जखमींवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान आशुतोष त्रिपाठी यांचा मृत्यू Uttar Pradesh Congress ।
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते आशुतोष त्रिपाठी हे विंध्याचलला भेट देऊन कुटुंबासह परतत होते. सोमवारी-मंगळवारी रात्री उशिरा काँग्रेसचे शहर अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी यांची कार ट्रकला धडकली होती, असे सांगण्यात आले. यामध्ये जखमी आशुतोष त्रिपाठी यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर गोला पोलीस स्टेशन हद्दीतील सरयू नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
काँग्रेस नेत्यांमध्ये शोककळा पसरली Uttar Pradesh Congress ।
काँग्रेसचे महानगर अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच काँग्रेस पक्षासह अन्य पक्षांच्या नेत्यांमध्ये शोककळा पसरली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष निर्मला पासवान यांनी महानगर अध्यक्ष आशुतोष त्रिपाठी यांच्या अपघातात मृत्यू झाल्याची पुष्टी केली.