सातारा, (प्रतिनिधी) – जगातील नंबर 1 ची टू व्हीलर उत्पादक कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पची पॉवरफुल व मजबूत ‘विडा’ ही इलेक्ट्रिक स्कूटर हिरोचे सातारा येथील अधिकृत विक्रेते सम्राट हिरोमध्ये दाखल झाली आहे. या स्कूटरच्या ऑनलाइन खरेदीवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट योजना आणली आहे.
हिरो मोटोकॉर्पने ग्राहकांना ‘व्हॅल्यू फॉर मनी’नुसार आतापर्यंत अनेक चांगल्या मोटारसायकल्स व स्कूटर्स दिल्या आहेत. त्याचप्रमाणे आता हिरो मोटोकॉर्प इलेक्ट्रिक स्कूटर प्रकारात उतरली असून, ‘ईव्ही’ प्रकारातील आपली पहिली स्कूटर ‘विडा’ गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच करण्यात आली आहे. विडा स्कूटरने अल्पावधीत संपूर्ण भारतात नावलौकिक मिळवला असून, आता सातार्यातही विडा स्कूटर दाखल झाल्याचे सम्राट हिरोतर्फे सांगण्यात आले.
हिरो कंपनीने फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांबरोबर ऑनलाइन विक्रीसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. जून महिन्यासाठी विडा इलेक्ट्रिक स्कूटरव0यग ऑनलाइन खरेदीवर 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट योजना आणली आहे.
या ऑनलाइन ऑफरमुळे आता ‘विडा व्ही वन प्लस’ स्कूटर फक्त एक लाख चार हजार रुपयांपर्यंत आणि ‘विडा व्ही वन प्रो’ ही स्कूटर फक्त एक लाख 21 हजार रुपयांपर्यंत ऑनरोड मिळत आहे. विडा खरेदीसाठी कमीत कमी 2.99 टक्के व्याजदराने कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यात अली आहे. त्यामुळे व्याजातसुद्धा 17 ते 18 हजारांपर्यंत बचत होणार आहे
हिरो विडा व्ही वन प्लस व व्ही वन प्रो या व्हेरिएंटची खास वैशिष्ट्ये म्हणजे, संपूर्ण एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट, टेललाइट, विंकर्स, सात इंची टीएफटी विथ डार्क आणि ऑटो मोड एलईडी टच स्क्रीन कॉन्सोल, ज्यामध्ये व्हेइकल कनेक्ट फॅसिलिटी, ज्यामध्ये टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, अँटी थेफ्ट अलर्ट, ट्रॅक माय बाइक, जिओ फेन्स, व्हेइकल डायग्नोस एसओएस अलर्ट विथ बटन,
डॉक्युमेंट स्टोअर फॅसिलिटी, ट्रिप मीटर, एलईडी बॅकग्राउंड डिझाइन चेंज मोड, मजबूत कणखर चॅसी, 12 इंची डायमंड कट अलॉय व्हील्स, ट्युबलेस टायर्स, फ्रंट डिस्क ब्रेक, याशिवाय इको मोड, राइड मोड, स्पोर्ट मोड हे तीन प्रकारचे राइड मोडस् आहेत.
इको मोडमध्ये गाडीचे 55 पर्यंतचे स्पीड मिळते. या स्पीडमध्ये फुल बॅटरी चार्जमध्ये 110 पेक्षा ज्यास्त किलोमीटरची रेंज मिळते. राइड मोडमध्ये 65 पर्यंतचे स्पीड व स्पोर्ट मोडला 85 च्या स्पीडने गाडी धावू शकते. सलग रोडसाठी कस्टम मोड व क्रूझ कंट्रोलसुद्धा आहे.
गाडीला रिव्हर्स गियर दिला असल्याने पार्किंगमधून बाहेर काढताना त्याचा उपयोग होणार आहे. गाडीवर बसण्याची पोझिशन आरामदायी असून, फोल्डेबल सीट आणि मोठा बूट स्पेस आहे. टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, मोबाइल चार्जर यूएसबी पोर्ट, ऑरेंज, रेड, व्हाइट, ब्ल्यू, ब्लॅक हे पाच कलर्स आणि विविध वैशिष्ट्यांसह या गाडीला 3.94 केडब्ल्यूएचच्या पोर्टेबल दोन बॅटरी आहेत. त्या तीन प्रकारे चार्ज करता येतात.
ते म्हणजे, गाडीवर रेगुलर पॉइंटवर, फास्ट चार्जर पॉइंटवर किंवा घरात नेऊनसुद्धा चार्ज करता येते. बॅटरीला तीन वर्षे किंवा 30 हजार किमीपर्यंत वॉरंटी आहे. शिवाय गाडीला 5 वर्षांची वॉरंटी आहे. 6 केडब्ल्यूची पीएमएसएम इंटिग्रेटेड गिअर बॉक्स अँड कंट्रोलर मोटार आहे. ग्राहकांनी हिरो विडाची टेस्ट राइड व खरेदीसाठी सम्राट हिरो, सातारा हायवे येथील शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.