Deepak Kesarkar | Uddhav Thackeray | NDA – उद्धव ठाकरे हे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत. त्यांना एनडीएमध्ये यायचे आहे असा खळबळजनक दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर आलेला असताना केसरकरांनी केलेल्या या विधानामुळे चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यातच नुकतेच निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आले होते. यामध्ये महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे.
मंत्री दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी बोलतांना त्यांनी आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शिवाय उशीरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाल्याची कबुली केसरकर यांनी दिली.