Uddhav Thackeray । आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातील राज्यातील सर्वपक्षीय नेते आणि आमदार विधीमंडळात दाखल झाले आहे. यावेळी शिसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तसेच विधान परिषदेतील आमदार उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी विधानभवनातील एकाच लिफ्टने प्रवास केला.
दरम्यानचे फोटो आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. लिफ्टमध्ये त्यांच्याबरोबर प्रवीण दरेकर, छगन भुजबळ आणि मिलिंद नार्वेकरही लिफ्टमध्ये होते. त्यामुळे नेमकी लिफ्टमध्ये या दोन नेत्यांमध्ये कोणती चर्चा झाली असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे. या चर्चांवर आता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लिफ्टमधून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी छगन भुजबळांना प्रश्न विचारल्यावर भुजबळ म्हणाले, ‘आम्ही सर्वजण तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर गेलो. लिफ्टमध्ये जाणं आणि बाहेर पडण्यात वेळ गेला. त्यामध्ये किती भेटणार, किती बोलणार? लिफ्टमध्ये सर्वांनी हस्तांदोलन केलं. कसे आहात वगैरे विचारलं. नेहमीप्रमाणे एखादा ओळखीचा नेता भेटल्यावर करतात ते सोपस्कार केले. असं म्हणत त्यांनी प्रतिक्रिया दिली.