Uddhav Thackeray । राज्यातील मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघात आज विधानपरिषद निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. नाशिक वगळता अन् मतदार संघात थेट महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदान केले. त्यावेळी, माध्यमांशी बोलताना उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, सौ. रश्मीवहिनी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे ह्यांनी आज मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. pic.twitter.com/BEriLZkt4B
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 26, 2024
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘.उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, उद्या मी सर्व विषयावर बोलेन,” असे यांनी म्हटले. दरम्यान, उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांन चहापानांचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, विरोधकांनी अघोषित परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला असून आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरेंनीही महायुती सरकारमधील भाजप आणि शिंदेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेत विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे.