Twinkle Khanna And Bobby Deol | अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. नुकतेच ट्विंकलने इन्स्टाग्रामवर बॉबी देओलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत ट्विंकलने बॉबी देओलसोबतची जुनी आठवण शेअर केली आहे. ट्विंकल खन्ना आणि बॉबी देओल यांनी 1995 मध्ये आलेल्या बरसात या चित्रपटात त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली होती. यात तिने बरसात या चित्रपटातील दोन फोटो आणि नुकत्याच झालेल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.
यात ट्विंकल खन्नाने लिहिले की, “कल और आज कल, फक्त पिंकी मावशीच बॉबी देओलची चाहती नाही. मी पण त्याला चांगलं काम करताना पाहुन प्रभावित झालीय. जुन्या आठवणी गोडी असतात, पुन्हा एकदा एकमेकांना आधीसारखं भेटून छान वाटलं.” नुकतीच ट्विंकल आणि बॉबी देओल यांची भेट झाली होती. यावेळी दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या फोटोंमध्ये आजही दोघे तितकेच सुंदर दिसत आहे. अनेक वर्षांनी भेट झाल्यामुळे ट्विंकलने आपल्या मित्राच्या कामाचं कौतुकही केले.
View this post on Instagram
1995 साली ‘बरसात’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून ट्विंकल खन्नाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. तर बॉबी देओल हा तिचा पहिला सह कलाकार होता. शिवाय बॉबी देओलनेही याच चित्रपटातून सिनेसृष्टीत पदापर्ण केलं होतं. दोघांसाठी हा चित्रपट खास असल्याने दोघांची अनेक वर्षांची खास मैत्री आहे.
दरम्यान, बॉबी देओल नुकताच संदीप रेड्डी वंगा यांच्या ॲनिमल चित्रपटात दिसला होता. यामध्ये त्याच्यासोबत रणबीर कपूर, अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना होते. यातील त्याच्या अभिनयाचे सर्वांच कौतुक केले होते. तर ट्विंकल खन्ना ही अभिनय क्षेत्रापासून दूर असून लेखिका म्हणून काम करत आहे.