पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलिस दलातून सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश माने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्यासह 15 उपनिरीक्षक, दोन सहाय्यक उपनिरीक्षक व एक हवालदार शुक्रवारी (ता. 31) सेवानिवृत्त झाले.
या अधिकारी, कर्मचार्यांचा पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सत्कार केला. तसेच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे-केदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन लांडगे आदी उपस्थित होते.
निवृत्त झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे : सहाय्यक पोलिस आयुक्त – सतीश माने, पोलिस निरीक्षक – ज्ञानेश्वर काटकर, पोलिस उपनिरीक्षक- राजन महाडीक, साईनाथ वरे, रावसाहेब थोरवे, वसंत फडतरे, गोरख थेऊरकर, चंद्रकांत काटे,
सुरेश रासकर, लक्ष्मण नरवडे, घेनसिद्ध पुजारी, सदाशिव खांडेकर, दिलीप लोखंडे, महादेव भागवत, रामहरी तनपुरे, दादाभाऊ पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक- अंकुश कदम, हरिभाऊ काळे, पोलिस हवालदार राजेंद्र दौंडकर.