खालापूर, (वार्ताहर) – खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक अमोल जाधव यांचे नुकतेच निधन झाले आहे. खोपोलीत सर्व पक्षीय शोकसभा आयोजित करण्यात होती. खोपोली शहरातील एक उमदा तरुण नेता हरवल्याची खंत सर्व पक्षीय नेत्यांनी या वेळी व्यक्त केली.
या वेळी अमोल जाधव यांचा मुलगा अधिराज, भाऊ लक्ष्मण जाधव, हभप तानाजी महाराज कर्णूक, हभप कृष्णाजी लांबे आदी उपस्थित होते. या वेळी शिवसेना शिंदे गट, शिवसेना बाळासाहेब उध्दव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस, आरपीआय, शेकापक्ष, वंचित बहुजन आघाडी, भाजप, मनसे आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अपघातग्रस्त टिम, सहजसेवा फाउंडेशन, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सकल मराठा समाज बांधव यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.
कितीही संकट आले तरी आत्महत्या हा मार्ग नसल्याचे हभप लांबे महाराजांनी सांगत अंर्तमुख व्हा चांगले मित्र जोडण्याचे अवाहन केले. माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकरा, आमदार महेंद्र थोरवे, सकल मराठा राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील, शिंदे गट संपर्क प्रमुख विजय पाटील,
शेकापक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष जे. पी. पाटील, माजी नगरसेवक मोहन औसरमल, भाजप महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, राजन सुर्वे आदींनी आठवणींना उजाळा देत श्रध्दाजंली अर्पण केली.