कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड- हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी- भेडशी ते राज्य हद्दीमधील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी 31 ऑक्टोबर 2024 अखेर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक सुरक्षा उपाययोजनेनुसार वाहतुक नियंत्रित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी रोडच्या बाजूचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधून एसटी वाहतुक सुध्दा सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
चंदगड पोलीस ठाणे हद्दीतून बेळगांव, शिनोळी, पाटणे फाटा, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटणवाडी, तिलारीनगर या मार्गावरुन येणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात होते. हा घाट हा खुपच अरुंद असल्याने घाटामध्ये वारंवार अपघात घडत असतात.