चिंबळी, (वार्ताहर) – कुरुळी (ता. खेड) गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज व खंडोबा महाराजांच्या उत्साहाचे औचित्य साधून बैलगाडा हिंद केसरी नियंत्रित 20-20 बैल गाडा घाटा नं. 1 मध्ये बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला होता. तीन दिवस रंगलेल्या शर्यतीत 426 गाडे धावले.
फायनलमध्ये बिर्जेस धुमाळ-प्रदिप टिंगरे, विलास काळोखे- विकास नायकवडी, राजूशेठ जवळेकर-सदाशिव लांडगे, बबनराव पाचुंदकर-रामनाथ वारिंगे, निलेश लोखंडे-रामनाथ विष्णू वारिंगे यांच्या जुगंगलबंदीने बैलगाडा घाटात रंगत आणली होती.
या पाचही जोडींना एक नंबरचे अंतिम सामन्याचे बक्षीस विठ्ठल रुख्मिणी ट्रस्ट अध्यक्ष गुलाब सोनवणे, माजी अध्यक्ष रामनाथ सोनवणे, युवाउद्योजक, शंतनु क्रेन सर्व्हिस, पेट्रोलियम, एस. के.ट्रॅक्टरचे सर्वेसर्वा अमोल सोनवणे यांच्या वतीने एक ट्रॅक्टर भेट देण्यात आला.
या बैलगाडा शर्यतीत उपस्थित मान्यवरांना कै. कृष्णाजी सोपानराव कड यांच्या स्मरणार्थ खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका, माजी अध्यक्ष कमल कड, युवा उद्योजक भरत कड, प्रगतिशील शेतकरी पाडुरंग कड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्हेनभोजन देण्यात आले. या बैलगाडा शर्यती घाटामध्ये आमदार दिलीप मोहिते मोहिते पाटील उपस्थित राहून सर्व गाडामालकांना व ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.
या बैलगाडा शर्यतीचे बक्षीस वितरण सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. या बैलगाडा शर्यतीचे आयोजन ग्रामस्थ व श्री भैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.