सध्या मनोरंजनासाठी प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. आता क्वचित लोक थेटरमध्ये जाऊन चित्रपट बघतात. आता सगळे चित्रपट आणि वेब सिरीज तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. जुलै महिन्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट, वेब सीरिज लाँच होणार आहेत. त्या वेबसिरीज कोणत्या आहेत? त्याबद्दल जाणून घेऊया…
1) मिर्झापूर-3
बहुप्रतिक्षीत मिर्झापूर या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 5 जुलैपासून ‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन स्ट्रीम होणार आहे. ही वेबसिरीज प्राईम व्हिडीओवर तुम्हाला पाहता येणार आहे.
2) गरुडन
दाक्षिणात्य चित्रपट गरुडन थिएटर्सनंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तमिळ-भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो वेत्रीमारन यांच्या मूळ कथेवरून आर.एस. दुराई सेंथिलकुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सूरी, एम. शशिकुमार आणि उन्नी मुकुंदन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर 3 जुलै रोजी रिलीज होणार आहे.
3) रेड स्वान
रेड स्वान ही कोरियन वेब सीरिज आहे. एका यशस्वी महिला गोल्फपटूच्या जीवनाभोवती या वेब सीरिजची कथा आहे. एक अंगरक्षक नेमल्यानंतर तिच्या कुटुंबाच्या काळ्या बाजूबद्दल माहिती मिळते. नेमकं काय कळतं? तिच्या आयुष्यात काय बदल होतात? हे आपल्याला ही वेबसिरीज पाहिल्यावरच समजेल. ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 3 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
4) स्पेस कॅडेट
पार्ट्यांमध्ये रमलेली एका मुलगी नासाच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी निवडली जाते. नासासाठी या मोहिमेसाठी ती शेवटची अपेक्षा असते. अंतराळ मोहिमेच्या प्रशिक्षणादरम्यान काय घडते? तिच्या आयुष्यात काय बदल होतात? यावर ही संपूर्ण वेबसिरीज आधारित आहे. 4 जुलैपासून प्राईम व्हिडीओवर ही वेबसिरीज स्ट्रीम होणार आहे.
5) ‘ही वेंट दॅट वे’
He Went That Way हा 2023 चा अमेरिकन क्राइम ड्रामा चित्रपट आहे. दिग्दर्शक जेफ्री डार्लिंगचा हा पदापर्णातील चित्रपट आहे. एका सीरियल किलर भोवती या चित्रपटाची संपूर्ण कथा फिरताना दिसते. जिओ सिनेमावर 5 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.