Number Port Rules| सिम कार्डसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) नियमात बदल करण्यात आला आहे. TRAI ने युजर्सच्या सुरक्षेचा विचार करून नियमांमध्ये बदल केला आहे. त्यानुसार आता हा नवा नियम 1 जुलै 2024 पासून करोडो दूरसंचार वापरकर्त्यांसाठी लागू केला जाणार आहे.
नवीन नियम लागू झाल्यानंतर आता लोकांना सिमकार्ड पोर्ट करण्यासाठी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. या नियमांबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे फसवणुकीसारख्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल.
काय होणार फायदा?
सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. या पूर्वी सिमकार्ड चोरीला गेल्यावर किंवा खराब झाल्यानंतर तुम्हाला दुकानातून लगेच सिमकार्ड मिळायचं. पण आता त्याचा लॉकिंग पीरियड वाढवण्यात आला आहे. आता युजर्सना नवीन सिमसाठी सात दिवस वाट पाहावी लागेल, त्यानंतरच नवीन सिम कार्ड मिळेल. एमएनपी नियमांत बदल केल्यानंतर सात दिवस हा लॉकिंग पीरियड ठरवण्यात आला आहे. Number Port Rules|
फ्रॉड आणि फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक प्रकरणांमध्ये असं दिसून आलं की एकदा सिमकार्ड चोरीला गेल्यानंतर तो नंबर दुसऱ्या सिमकार्डवर ॲक्टिव्हेट केला गेला. यानंतर आणखी काही घटना घडवून आणल्या जातात. आता ऑनलाईन स्कॅमसारख्या घटना रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या बाबतचं नोटिफिकेशन ट्रायने मार्चमध्ये जारी केले होते. Number Port Rules|
सिम स्वॅपिंग फ्रॉडपासून संरक्षण
हे करण्यामागचा उद्देश सिम स्वॅपिंग फ्रॉडपासून संरक्षण करणे हा आहे. सिम स्वॅपिंगचा अर्थ एकच नंबर दुसऱ्या कोणत्याही सिम कार्डवर ॲक्टिव्हेट करणे. अशी अनेक प्रकरणेही समोर आली होती ज्यामध्ये सिमकार्ड चोरीला गेल्यानंतर तोच क्रमांक अन्य काही सिमकार्डवर ॲक्टिव्हेट केल्याचे दिसून आले. यानंतर फसवणुकीची घटना घडली आहे. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम लागू केले जात आहेत.
हेही वाचा:
राष्ट्रवादीची विधानपरिषदेची यादी कधी येणार? ; प्रफुल पटेल म्हणाले,”अजित पवार यांनी..”