उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला टोला लगावला आहे. करिअर, पॅशन यासंदर्भात बोलताना , उदाहरण देताना फडणवीस म्हणाले,’एखाद्याला जर फोटोग्राफीची आवड असेल पण तो मुख्यमंत्री झाला तर अडचण होते म्हणून ‘एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची आवड असते, पॅशन असते, त्या व्यक्तीने त्याच गोष्टी कराव्यात.’ असेही ते म्हणाले आहे.
नुकतेच विधानभवनाच्या लिफ्ट मध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केला यावेळी नेमकी त्यांच्यात काय चर्चा झाली असावी असा प्रश्न चर्चेत आला होता. अशात आता फडणवीस यांनी नाव न घेता टीका केल्यामुळे पुन्हा राजकारण तापले आहे. अशातच संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याचीच अप्रत्यक्ष मागणी केली आहे. त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकांपुढे शाब्दिक वॉर दोन्ही युतीकडून होतांना दिसत आहे.
आमदार अमित साटम यांच्या “उडान” पुस्तकाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फडणवीस यांनी कार्यक्रमातील उपस्थितांशी संवाद साधला ते म्हणाले,’ अतिशय व्यस्त अशा राजकारणातून वेळ काढून अमित साटम यांनी पुस्तक लिहिले. मी थोडं वाचले आहे. नव्या पिढीला दिशा देण्याचे काम या पुस्तकातून केले आहे. अमित साटम हे आक्रमक राजकारणी आहेत. राजकारण सोडून शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून अमित साटम प्रसिद्ध आहेत. के श्रीकांत हे ज्याचे आवडते फलंदाज असतील तर ती व्यक्ती आक्रमक असणारच. ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्या आमदारांमध्ये अमित साटम यांचे नाव येते. अनेक आमदार फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी बोलतात. फक्त तीन ते चार आमदार असे आहेत ज्यांना विषयाची पूर्ण माहिती असते, त्यातले अमित साटम आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी यावेळी साटम यांची स्तुती केली.