Stock Market Opening| मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. ही तेजी आजही कायम राहिली आहे. गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा विक्रम उंचावला आहे. यावेळी सेन्सेक्सने पहिल्यांदाच 79000 चा टप्पा ओलांडला आहे. NSE निफ्टीनेही 23,974.70 चा उच्चांक नोंदवला आहे. बँक निफ्टीने प्रथमच 53,180.75 ही सर्वोच्च पातळी गाठली आहे.
शेअर बाजाराने नवीन उंची गाठली असतानाच काही शेअर्सने बाजाराला मोठा आधार दिला आहे. सेन्सेक्सच्या शेअर्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर्स वाढीसह आणि 18 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर आज सिमेंट शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सकाळी 3.16 टक्क्यांनी वाढल्यानंतर 11,502.35 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.
कोणत्या शेअर्समध्ये वाढ?
याशिवाय JSW स्टीलचा शेअर 1.53 टक्क्यांच्या वाढीसह 933.45 रुपयांवर व्यवहार करत होता. याशिवाय रिलायन्स, कोटक बँक, एचयूएल, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, बजाजा फायनान्स, ॲक्सिस बँक, इन्फी, एनटीपीसी आणि टाटा मोटर्सचे समभाग हिरव्या रंगात व्यवहार करत होते. Stock Market Opening|
डॉ रेड्डीज लॅब्स अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी असलेल्या रिलायन्सचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी वेगाने व्यवहार करत असून रिलायन्सच्या शेअरची किंमत 3000 रुपयांच्या पुढे गेली आहे. Stock Market Opening|
कोणते शेअर्स तोट्यात?
तर श्रीराम फायनान्स, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टीसीएस, टेक महिंद्रा आणि आशियाई बाजारात दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई, हाँगकाँगचा हँग सेंग, चीनचा शांघाय कंपोझिट या कंपन्यांना तोटा सहन करावा लागला.
हेही वाचा:
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; विरोधक ‘या’ मुद्दयांवरून सरकारला घेरण्याची शक्यता