Dress Code । कॉलेज ड्रेसचा मुद्या अनेकदा चर्चेत येतो.अशातच मुंबईत चेंबूर परिसरातील असलेल्या आचार्य-मराठी महाविद्यालयाने हिजाब बंदी केल्यामुळे ते मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. हिजाब बंदीनंतर या कॉलेजने पुन्हा एकदा नवी नियम लागू केला आहे. या नव्या निर्णयानुसार आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि जर्सीही परिधान करता येणार नाही.
महाविद्यालय प्रशासनाने नवा ड्रेसकोड लागू करत जीन्स, टी-शर्ट आणि जर्सीवर बंदी घातली आहे. हिजाब बंदीनंतर महाविद्यालय प्रशासनाने लागू केलेला हा नवा ड्रेसकोडवर आता विद्यार्थी आणि पालक विरोध करत आहे. आता ड्रेसकोड संदर्भात विशेष नियमावली महाविद्यालय प्रशासनाने जारी केली आहे.
दरम्यान. हिजाब बंदीच्या नियमावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दाखल केली आहे. मात्र, ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. महाविद्यालय प्रशासनाने ड्रेस कोड नियमांबाबत आपली बाजू मांडतांना सांगितले की,’ विद्यार्थ्यांनी धर्म प्रकट करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारा कोणताही पोशाख घालू नये. नकाब, हिजाब, बुरखा, टोपी, बॅज इत्यादी तळमजल्यावरील कॉमन रूममध्ये जाऊन काढले जातील आणि त्यानंतरच ते कॉलेज कॅम्पसमध्ये फिरू शकतील, असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे. फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सी यांना सुद्धा परिधान करण्यास कॉलेज परिसरात परवानगी नसेल, असेही परिपत्रकात म्हटले आहे