Hasan Mushrif| लोकसभा निवडणुकींच्या निकालानंतर आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बसविलेल्या एमआरआय मशीनचे उद्घाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विधानसभा निवडणूक आली असल्याने सर्वच पक्षात ताक घुसळल्यासारखी स्थिती निर्माण होईल, असे विधान मुश्रीफ यांनी केले.
काही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, “शिवसेना, राष्ट्रवादीचे दोन पक्ष, भाजप, काँग्रेस, आरपीआय, बहुजन वंचित असे अनेक पक्ष आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ताक घुसळल्यासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल होईल.” यावेळी त्यांनी लोकसभेच्या निकालावरुन विधानसभेचा अंदाज बांधणे चुकीचे ठरेल, कारण प्रश्न वेगवेगळे असल्याने आम्हाला अडचण वाटत नसल्याचा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला. Hasan Mushrif|
१६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची घेतली भेट
दरम्यान, नुकतेच पिंपरी चिंचवड येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली. रात्री उशिरा पवार यांच्या पुण्यातील मोदी बाग येथील निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती समोर आली. Hasan Mushrif|
शरद पवार यांनी आता आपले लक्ष एकच आहे आणि ते म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका..” असं म्हटलं आहे. अशात लोकसभेतील यशानंतर आता शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करत असताना इतर पक्षातून येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांसाठी पवार यांनी आपल्या पक्षाची दारे खुली केल्याचं दिसत आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वी अजित गटाला खिंडार पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा:
‘मुस्लिम राष्ट्रानुसार काही… ; TMC आमदाराकडून बंगालमध्ये महिलेला मारहाण प्रकरणावर वादग्रस्त टिप्पणी