सासवड, (प्रतिनिधी) – भविष्यामध्ये पर्यावरण जपणे गरजेचे असून पर्यावरण वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे पर्यावरण चांगले तर आरोग्य चांगले निसर्ग माझा मित्र ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात अणावी, असे आवाह अॅड. अक्षय नाझीरकर यांनी केले.
सासवड तालुका विधी सेवा प्राधिकरण व सासवड बार असोसिएशनचे संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे सासवड दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजन केले होते, त्यावेळी अॅड. नाझीरकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख न्यायाधीश ताहेर बिलाल होते. याप्रसंगी अध्यक्ष अॅड. बाबासाहेब पिलाने, राहुल कोलते, शुभम राऊत, आदी सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गणेश उरणे यांनी तर अॅड. ज्योती जगताप यांनी आभार मानले.