Mukhyamantri Majhi Ladki bahin Yojana । अजित पवार यांनी काल लाडकी बहीण नावाने या योजनेची घोषणा केली आहे. परंतू या योजनेचा फायदा कोणत्या वर्गातील महिलांना मिळणारयावरून आता चर्चा रंगली आहे. अशात आदिती तटकरे या योजनेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील नेमक्या कुठल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार याबाबतही त्यांनी संगितलं आहे.
Mukhyamantri Majhi Ladki bahin Yojana । नेमक्या काय म्हणाल्या अदिती तटकरे..
राज्यातील लाडकी बहन योजनेचा लाभ अडीच कोटी महिलांना मिळणार आहे. महिलांना थेट खात्यात १५०० रुपये मिळणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने लेक माझी लाडकी योजना आणली आणि त्याचा लाभ अडीच लाख पेक्षा जास्त बालिकांना झाला.
‘मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी’ योजना जाहीर झाली आहे. अडीच कोटी महिलांच्या खात्यात थेट 1,500 रुपये जमा होणार आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने DBT च्या लाभार्थ्यांना थेट मदत मिळते. थेट अकाऊंटमध्ये हा निधी वितरीत होतो. जो लाभार्थी निकष पूर्ण करतो त्याच्या अकाऊंटमध्ये हा पैसा जाणार असल्याने या योजनेचे विरोधकांनी स्वागत करायला हवे असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
Mukhyamantri Majhi Ladki bahin Yojana । ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ बाबतच्या अटी बाबत बोलतांना त्यांनी सांगितले…
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या नावाने असणार आहे. योजनेत 21 ते 60 वयोगटातील महिलांना लाभ होणार आहे, मात्र, लाडकी बहीण योजनेचा लाभ हा राज्यातील अडीच कोटी महिलांना मिळणार असला तरी याच्या काही अटी देखील आहेत. अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
सरकारी कामात असणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार नाही. आर्थिक दुर्बल घटकातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.