मुंबई : विधान परिषदेच्या 4 जागांच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निकालात ठाकरे गटाने बाजी मारत भाजपला मोठा झटका दिला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
जयानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष केला. मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात लढत झाली होती. यामध्ये अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव करत ही निवडणूक जिंकली.
अनिल परब यांना या निवडणुकीत 44,791 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या किरण शेलार यांना 18,771 मते मिळाली आहेत. अनिल परब 26 हजार 20 मतांनी विजयी झाले आहेत.