टाटा कंपनीने आपल्या शेअरधारकांना डिव्हिडेंडच्या रुपात मोठे गिफ्ट देणार आहे. यामुळे गुंतवणूकदार मालामाल होणार आहेत. टाटा ग्रुपच्या या निर्णयामुळे या कंपनीच्या शेअरधारकांचे खिसे पैशाने भरणार आहेत. आता तुम्ही विचार करत असाल आम्ही कोणत्या कंपनीबद्दल बोलत आहे तर त्या कंपनीचे नाव आहे Tata Elxsi .
Tata Elxsi या कंपनीने शेअरधारकांना 70 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने डिव्हिडेंड (लाभांश) देण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच कंपनीने लाभांशाची रेकॉर्ड डेटदेखील ठरवली आहे. कंपनीने या डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट 25 जून 2024 ठेवली आहे. ज्या शेअरधारकांकडे या कंपनीचे शेअर्स असतील, त्यांनाच या डिव्हिडेंड फायदा घेता येणार आहे.
टाटा ग्रुपची Tata Elxsi ही कंपनी हेल्थकेयर, ट्रांसपोर्टेशन, कम्युनिकेशन, ऑटोमोटिव्ह, बॉडकास्ट आदीसाठी टेक्नोलॉजी और डिझाइन देण्याचे काम करते. वित्त वर्ष 2023-24 मध्ये जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 2.32 टक्क्यांनी घट झाली होती. मात्र आता कंपनीला मोठा नफा झाला आहे. मागील वर्षी याच काळात कंपनीने एकूण 201.50 कोटी रुपयांची कमाई केली होती.