Nagesh Patil Ashtikar | लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले. यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र यादरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांची तक्रार केल्याने मविआमध्ये वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीत विरोधात प्रचार केल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेचे तिकीट मिळू नये, अशी तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महाविकास आघाडीकडे केली आहे. या संदर्भात काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांच्याकडे आष्टीकर यांनी पत्राद्वारे तक्रार केली आहे.
नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्रात काय म्हंटले ?
कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रज्ञा सातव यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेच्या विरोधात काम केल्याचं आमच्या निदर्शनास आले आहे. प्रज्ञा सातव यांनी पक्षाच्या सूचनांचा विरोध करत वंचित बहुजन आघाडी आणि एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचा आरोप नागेश पाटील आष्टीकर यांनी केला. लोकसभा निवडणुकीत त्या एकाही प्रचार मोहिमेत एकाही सभेत सहभागी झाल्या नाहीत, असेही नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. Nagesh Patil Ashtikar |
नागेश पाटील आष्टीकर यांनी के.सी. वेणूगोपाल यांच्याकडे या प्रकरणाच्या चौकशीची प्रज्ञा सातव यांच्या निवडणुकीच्या काळातील भूमिकेची चौकशी करुन राज्यात इंडिया आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी योग्य शिस्तपालनासंदर्भातील कारवाई करा, अशी विनंती केली आहे.
दरम्यान, नागेश पाटील आष्टीकर यांनी बाबुराव कदम यांचा पराभव करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. मात्र आता आष्टीकर यांच्या पत्राने पुन्हा एकदा महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Nagesh Patil Ashtikar |
हेही वाचा:
“NEET पेपर लीक, आणीबाणी अन् लोकसभेचे निकाल…” ; सोनिया गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल