T20 World Cup 2026 : भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. भारताने विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. टी-20 विश्वचषकाची ही 9वी आवृत्ती होती. यासह, चाहत्यांना आता पुढील टी-20 विश्वचषक कधी खेळला जाईल, कोणता देश यजमानपद भूषविणार हे जाणून घ्यायचे आहे. आता पुढील विश्वचषकाची सर्व माहिती येथे जाणून घेऊया…
पुढील टी-20 विश्वचषक कधी होणार?
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, आता पुढचा टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळवला जाणार आहे. आयसीसी ने 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी फेब्रुवारी ते मार्चची विंडो दिली आहे. 2026 आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक ही स्पर्धेची दहावी आवृत्ती असेल. या विश्वचषकात एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत.
पुढील टी-20 विश्वचषक कुठे खेळवला जाईल?
पुढील विश्वचषक म्हणजेच 2026 टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाईल. दोन्ही देश संयुक्तपणे याचे आयोजन करणार आहेत. 2024 टी-20 विश्वचषकातील सुपर-8 संघ 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. ग्रुप स्टेजमधून बाहेर पडल्यानंतरही, श्रीलंकेने यजमान म्हणून थेट पात्रता मिळवली आहे तर भारताने 2024 चा विश्वचषक जिंकला आहे. ते गतविजेते म्हणून पुढील आवृत्तीचा भाग असतील.अहवालानुसार, 2026 टी-20 विश्वचषकातील बहुतांश सामने भारतात खेळवले जातील. या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा संघही भारतात येणार आहे.
दरम्यान, टी-20 वर्ल्ड कप 2026 चे आयोजन भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. याचा थरार फेब्रुवारीमध्ये सुरू होऊ शकतो. टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये 12 जण पात्र ठरले आहेत. तर 8 संघ पात्रता फेरीतून येतील. 20 संघांमध्ये एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरलेले देश – भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि पाकिस्तान.