T20 World Cup 2024 (IND vs PAK) : टी-20 विश्वचषकाच्या 11व्या सामन्यात गुरूवारी पाकिस्तानचा सामना यजमान अमेरिकेशी झाला. हा गट-अ सामना डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेतील पहिला मोठा उलटफेर अमेरिकेने घडवला आहे. त्यांनी अ गटातील सामन्यात 2009 च्या चॅम्पियन पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे.
2024 च्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि त्यातच त्यांना त्यांच्यापेक्षा खूपच कमकुवत असलेल्या अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. आता या रविवारी, 9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात T20 विश्वचषक 2024 चा महान सामना रंगणार आहे. नॅसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे रात्री 8 वाजल्यापासून या सामन्यात दोन्ही संघ भिडतील. या मोठ्या सामन्यापूर्वी, चाहते IND vs PAK सामना कधी, कुठे आणि कसा विनामूल्य (Free) पाहू शकतात ते जाणून घेऊया….
टी-20 विश्वचषक 2024 चा 19 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. वेबसाइट, ओटीटी ॲप आणि टीव्ही चॅनलवर तुम्ही या सामन्याचा आनंद घेऊ शकता. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. तुम्ही हा सामना डीडी स्पोर्ट्स आणि फ्री डिशवर विनामूल्य पाहू शकता. तसेच, डिस्ने प्लस हॉटस्टारवर सामन्याचे थेट प्रक्षेपण विनामूल्य केले जाईल.
टीव्ही चॅनल : तुम्ही सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. यामध्ये तुम्ही विविध भाषांमधील चॅनलवरही हा सामना पाहू शकता. यामध्ये स्टार स्पोर्ट्स 1 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 2 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 2 (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी (एचडी+एसडी), स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ (HD+SD), स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु (HD+SD), मा गोल्ड, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड, सुवर्णा प्लस SD, DD स्पोर्ट्स या चॅनेलचा समावेश आहे.