T20 World Cup 2024 (AUS vs OMA ) : टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पहिल्या सामन्यात मिचेल मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने ओमानचा 39 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात मार्कस स्टॉइनिसने महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रथम, स्टॉइनिसने फलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली आणि 186.11 च्या स्ट्राइक रेटने 67* धावांची धडाकेबाज खेळी खेळली आणि नंतर गोलंदाजी करताना 3 बळी घेतले.
केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओमानचा गोलंदाजीचा निर्णय पहिल्या डावातील पहिल्या 10 षटकांसाठी प्रभावी वाटत होता, मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी गियर बदलून आक्रमक फलंदाजी सुरू केली. डेव्हिड वॉर्नर 56(51) आणि मार्कस स्टॉइनिस 67*(36)यांनी अर्धशतके झळकावली. तर ग्लेन मॅक्सवेल पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. तो पुन्हा एकदा गोल्डन डकचा बळी ठरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 20 षटकात 5 विकेट गमावत 164 धावा केल्या आणि ओमानला 165 धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानला 20 षटकांत 9 गडी बाद 125 धावाच करता आल्या. अयान खानने ओमानसाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 30 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. या काळात स्टॉइनिसने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 3 बळी घेतले.
Australia get their #T20WorldCup 2024 campaign rolling with a comfortable win over Oman in Barbados 🙌#AUSvOMA ➡ https://t.co/Q3iyHSLOfc pic.twitter.com/FrdZJYMfUZ
— ICC (@ICC) June 6, 2024
ओमानचा संपूर्ण डाव ….
विजयासाठी 165 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानची सुरुवात खूपच खराब झाली. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर गोल्डन डकचा बळी ठरलेल्या प्रतीक आठवलेच्या रूपाने संघाने पहिल्याच षटकात पहिली विकेट गमावली. त्यानंतर 5व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कश्यप प्रजापतीच्या रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली. कश्यपने 16 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने केवळ 7 धावा केल्या.
यानंतर सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार आकिब इलियास पॅव्हेलियनमध्ये परतला. आकिबने 18 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या. त्यानंतर 8व्या षटकात झीशान मसूदच्या (01) रूपाने संघाने चौथी विकेट गमावली. त्यानंतर संघाला पाचवा धक्का 12व्या षटकात खालिद कैलच्या रूपाने बसला, जो 12 चेंडूत 1 षटकाराच्या जोरावर केवळ 08 धावा करू शकला.
ओमानचा विकेट्स गमावण्याचा क्रम सुरूच राहिला आणि 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शोएब खानच्या रूपाने संघाने सहावी विकेट गमावली, जो खाते न उघडता ॲडम झंपाचा बळी ठरला. त्यानंतर ओमानला 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अयान खानच्या रूपाने सातवा धक्का बसला, ज्याने 30 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 36 धावा केल्या. यानंतर 19 व्या षटकात मेहरान खान 16 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि 20 व्या षटकात शकील अहमदच्या रूपाने संघाने 9वी विकेट गमावली. शकीलने 10 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा केल्या.
T20 World Cup 2024 : युगांडाच्या गोलंदाजाने रचला इतिहास, वयाच्या 43 व्या वर्षी केला विश्वविक्रम…
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची आश्चर्यकारक कामगिरी…
ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक 3 बळी घेतले. यादरम्यान त्याने 3 षटकात 19 धावा दिल्या. याशिवाय मिचेल स्टार्क, नॅथन एलिस आणि ॲडम झाम्पाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.