Live Cricket Score (T20 World Cup 2024, Super 8, IND vs AUS) : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर एटमधील गट 1 मधील महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित आहे आणि हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर मागील सामना गमावलेल्या ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो या मरो असा आहे.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा ऑस्ट्रेलिया संघाच्या बाजूनं लागला आहे. भारताविरुद्धच्या सुपर एट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ फलंदाजीसाठी प्रथम मैदानात उतरेल.
It’s the clash of the titans 💥
Australia have won the toss and elected to field first against India.#T20WorldCup | #AUSvIND | 📝: https://t.co/f1scOKtTA7 pic.twitter.com/xomBnyd6Op
— ICC (@ICC) June 24, 2024
ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. संघाने ॲश्टन आगरच्या जागी मिचेल स्टार्कचा अकरामध्ये समावेश केला आहे. दुसरीकडे, भारताने या सामन्यासाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
IND vs AUS : दोन्ही संघांची Playing 11 खालीलप्रमाणे….
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दरम्यान, सेंट लुसिया येथील हवामान आल्हाददायक आहे आणि सध्या पाऊस पडत नाही. माजी भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिकने फोटो शेअर करताना सांगितले की, सध्या हवामान ठीक आहे, पण थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 31 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 19 सामने जिंकले आहेत, तर कांगारू संघाने 11 सामने जिंकले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड पूर्णपणे भारतीय संघाच्या बाजूने दिसत आहे. दुसरीकडे टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांच्या विक्रमांबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांमध्ये 5 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 3 सामने तर ऑस्ट्रेलियाने 2 सामने जिंकले आहेत.