T20 World Cup 2024 (Super 8, USA vs ENG) : टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेतल सुपर एट टप्प्यात आज (रविवारी) गतविजेता इंग्लंडचा सामना अमेरिकेशी होत आहे. इंग्लंडला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता आणि ते बाउन्स बॅक करून उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा बळकट करण्याचा प्रयत्न करतील. दुसरीकडे, उपांत्य फेरीच्या आशा संपल्या असल्या तरी अमेरिकेही सामना जिंकून उलटफेर करण्याचा प्रयत्न करेल.
‘करा किंवा मरो’ सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत अमेरिकेला 18.5 षटकात केवळ 115 धावांवर रोखले. उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी इंग्लंडला 116 धावांचे लक्ष्य लवकरात लवकर गाठावे लागेल.
Chris Jordan becomes the first English player to take a hat-trick at a T20 World Cup 💥
Some way to finish off the USA innings…#EnglandCricket | #ENGvUSA pic.twitter.com/zcC8Qd8JDP
— England Cricket (@englandcricket) June 23, 2024
इंग्लंडने नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु अमेरिकेची फलंदाजी अत्यंत खराब झाली. अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक 30 धावा केल्या आणि कोरी अँडरसनने 29 धावा केल्या. अँडरसनने हरमीत सिंगसोबत सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली, पण हरमीत बाद होताच अमेरिकेचा डाव पत्त्यासारखा गडगजला. हरमीतने 21 धावांचे योगदान दिले.
19 वे षटक टाकायला आलेल्या जॉर्डनने पाच चेंडूत चार बळी घेत अमेरिकेचा डाव लवकर गुंडाळला. जॉर्डनने 19 व्या षटकात कोरी अँडरसन(18.1) ,अली खान(18.3), नॉथुश केन्झिगे(18.4) आणि सौरभ नेत्रावलकर(18.5) यांना बाद केले. अली, केंजिगे आणि नेत्रावळकर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. अमेरिकेच्या केवळ पाच फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने एका षटकात हॅटट्रिकसह 4 बळी घेतले. त्याने 2.5 षटकात 10 धावा देत 4 बळी घेतले. तर लेगस्पिनर आदिल रशीदने 4 षटकात केवळ 13 धावा देऊन दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. याशिवाय सॅम करनलाही दोन यश मिळाले. रीस टॉप्ली आणि लियाम लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.