T20 World Cup 2024 (Super 8, WI vs SA) : यजमान वेस्ट इंडिजला टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सोमवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सुपर एट टप्प्यातील शेवटचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावा लागेल. हा सामना सोमवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 6.00 वाजता खेळवला जाईल. सुपर एट टप्प्यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर वेस्ट इंडिजने सह-यजमान अमेरिकेचा नऊ गडी राखून पराभव केला होता.
आता विजयासह त्यांचा अंतिम चारमधील प्रवेश निश्चित होईल. तर पराभवासह, प्रकरण नेट रनरेटवर जाईल आणि तेही जर अमेरिकेने दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला हरवले तर हे समीकरण होईल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंतचे सर्व सहा सामने आणि (सुपर-8 मधील 2) जिंकले असले तरी त्यांनाही विजय आवश्यक आहे. जर ते हरले तर त्यांचे अंतिम चार गाठणे देखील उर्वरित सामन्यांचे निकाल आणि निव्वळ धावगती यावर अवलंबून असेल. मात्र, दोन्ही संघांचे उपांत्य फेरीचे चित्र इंग्लंड विरूध्द अमेरिका सामन्यानंतर आणखी स्पष्ट होईल.
ANTIGUA!! 🇦🇬🇦🇬. Come out and let’s RALLYYY!! 💃🏽🕺🏾
West Indies v South Africa🌴🏏🔥
🗓️Sunday June 23rd | 8:30pm!
🏟️Sir Vivian Richards StadiumGET YOUR TICKETS EARLY!🎟️
Box office: Sir Vivian Richards Stadium
Online: https://t.co/zwZWH3Im28#WIREADY | #MenInMaroon | #WIvSA pic.twitter.com/S4hd0gnK6g— Windies Cricket (@windiescricket) June 22, 2024
वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंडविरुद्ध स्ट्राइक रोटेट करण्यात अपयशी ठरला होता पण अमेरिकेविरुद्धच्या या उणीवावर त्यांनी मात केली. शाई होपने 39 चेंडूत 82 धावा केल्या आणि त्याच्याशिवाय निकोलस पूरन आणि आंद्रे रसेल हे देखील डेथ ओव्हर्समध्ये आक्रमक फलंदाजी करण्यात माहीर आहेत. काइल मायर्स देखील संधीची वाट पाहत आहे. विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची त्याची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता त्याला संधी दिली जाऊ शकते. वेस्ट इंडिजकडेही अकील हुसेन, गुडाकेश मोती आणि चेससारखे चांगले फिरकी गोलंदाज आहेत, जे मधल्या षटकांमध्ये धावगती रोखण्याची जबाबदारी पार पाडतील.
रोस्टन चेसने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “जेव्हा आम्ही पॉवर प्लेमध्ये चांगली कामगिरी करतो तेव्हा आम्ही सामना जिंकतो. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली असावी याकडे सध्या लक्ष असेल.”
दुसरीकडे, सर्व सामने जिंकूनही दक्षिण आफ्रिकेकडे आत्मविश्वास भरलेला दिसत नाही. अमेरिका आणि नेपाळसारख्या नवशिक्या संघांनी सामना जिंकताना नाकी नऊ आणले होते. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांनी धावा काढण्याची जबाबदारी पेलली आहे, तर एनरिच नोर्किया आणि केशव हे देखील गोलंदाजीत प्रभावी ठरत आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज म्हणाला, “आधीच्या सर्व विश्वचषकांवर नजर टाकली तर आम्ही अनेक जवळचे सामने गमावले आहेत. यावेळी आम्ही त्यांच्यावर विजय मिळवत आहोत, जे पाहून छान वाटते.”
सुपर-8 मध्ये आफ्रिका अव्वलस्थानी…
ग्रूप 2 मध्ये सुपर-8 लढतीत प्रत्येक संघाचे प्रत्येकी 2 सामने खेळून झाले असेल सर्वाचा प्रत्येकी 1 सामना बाकी आहे. सध्या आफ्रिका 4 गुणासह पहिल्या स्थानावर तर वेस्टइंडिज 4 गुणांसह(+1.814) तर इंग्लंड 2 गुणांसह (+0.412) तिसऱ्या स्थानावर आहे. तर युएसएला खातेही उघडता आलेले नाही.
दोन्ही संघाचे 15 सदस्यीय पथक खालीलप्रमाणे-
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नोर्किया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्राब्रिझस्टन, ट्राइझस्टन स्टब्स.
वेस्ट इंडिज : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकेल होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमारियो शेरफर्ड .