Pat Cummins Created History : ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषक 2024 च्या 48 व्या सामन्यात पॅट कमिन्सने इतिहास रचला. त्याने सलग दुसऱ्या टी-20 मध्ये विकेट्सची हॅट्ट्रिक घेतली. अफगाणिस्तानपूर्वी बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात कमिन्सने ही कामगिरी केली होती. यासह कमिन्सने मोठा इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषकात दोन हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला. इतकंच नाही तर लसिथ मलिंगाला त्याच्या संपूर्ण टी-20 कारकिर्दीत जो विक्रम करता आला नाही तो त्याने आपल्या नावावर केला.
अशी पूर्ण केली हॅट्ट्रिक….
अफगाणिस्तानच्या डावाच्या 18व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पॅट कमिन्सने राशिद खानला बाद केले. यानंतर 20 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर करीम जन्नतला पॅव्हेलियनमध्ये पाठविले. तर दुसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सने गुलबदिन नईबला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. याआधी मागील सामन्यात पॅट कमिन्सने बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. अशाप्रकारे पॅट कमिन्सने टी-20 विश्वचषकातील सलग 2 सामन्यात 2 हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा 5वा गोलंदाज…
कमिन्स आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये दोन हॅट्ट्रिक घेणारा केवळ पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा टीम साऊथी, सर्बियाचा मार्क पावलोविच आणि माल्टाचा वसीम अब्बास यांनी ही कामगिरी केली होती. कमिन्स हा पाचवा गोलंदाज आहे.
तथापि, सलग दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक विकेट घेणारा कमिन्स हा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील ही आठवी हॅट्ट्रिक ठरली. कमिन्सने यापैकी दोनदा ही कामगिरी केली आहे. सात गोलंदाजांनी आठ हॅटट्रिक घेतल्या आहेत.
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारे फलंदाज…
1. ब्रेट ली – विरुद्ध बांगलादेश (केप टाउन, 2007)
2. कर्टिस कॅम्फर – विरुद्ध नेदरलँड्स (अबू धाबी, 2021)
3. वानिंदू हसरंगा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका (शारजाह, 2021)
4. कागिसो रबाडा – विरुद्ध इंग्लंड (शारजाह, 2021)
5. कार्तिक मयप्पन – विरुद्ध श्रीलंका (गीलॉन्ग, 2022)
6. जोशुआ लिटल – विरूध्द न्यूझीलंड (ॲडलेड, 2022)
7. पॅट कमिन्स – विरुद्ध बांगलादेश (अँटिगा, 2024)
8. पॅट कमिन्स – विरुद्ध अफगाणिस्तान (किंग्सटाउन, 2024)
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकात हॅटट्रिक घेतली आहे. कमिन्सशिवाय ब्रेट लीने 2007 मध्ये ही कामगिरी केली होती. कमिन्स हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा गोलंदाज आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅटट्रिक घेणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज
ब्रेट ली vs बांगलादेश (केप टाउन,2007)
ॲश्टन आगर vs दक्षिण आफ्रिका (जोहान्सबर्ग,2020)
नाथन एलिस vs बांगलादेश (मीरपूर,2021)
पॅट कमिन्स vs बांगलादेश (अँटिग्वा, 2024)
पॅट कमिन्स vs अफगाणिस्तान (किंग्सटाउन, 2024)