T20 World Cup 2024 ( Virat Kohli) :- टी-२० विश्वचषकात विराट कोहली फॉर्ममध्ये परत येण्याच्या प्रतिक्षेत होता. पण एकाच ७६ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीने विराटने सर्वांनाच तो किंग कोहली का आहे हे पटवून दिले. ३५ वर्षीय विराट कोहली हा विश्वचषकाच्या इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू बनला आहे ज्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील सर्व करंडक आपल्या नावे केले आहेत.
विराटच्या करंडक संग्रहात आता एकमेव ट्रॉफी बाकी आहे ती म्हणजे कसोटी विजेतेपद . कोहलीने त्याच्या कारकिर्दीत दोन आयसीसी कसोटी विजेतेपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेतला आहे, परंतु दोन्ही प्रसंगी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यानंतर विराटने टी-२० क्रिकेटला अलविदा केले आहे.
कोहलीने जिंकलेल्या आयसीसी करंडक
– १९ वर्षांखालील विश्वकरंडक – २००८
– एकदिवसीय विश्वकरंडक २०११
– चॅम्पियन्स करंडक – २०१३
– टी-२० विश्वकरंडक – २०२४
विराट कोहलीचा शेवटचा डाव…
2024 च्या T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीला 7 डावात केवळ 75 धावा करता आल्या होत्या. पण त्याला असेच काही मोठ्या सामन्याचा खेळाडू म्हटले जात नाही. कोहलीने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आणि कारकिर्दीच्या अंतिम सामन्यात 76 धावांची अप्रतिम खेळी खेळली आणि तो काय हे दाखवून दिले. दरम्यान, या महत्वपूर्ण खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.