T20 World Cup 2024 (IND vs ENG Semi Final 2) :- टी-20 विश्वकरंडक 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीचा थरार आता संपला असून आता उपांत्य फेरीचे वेध लागले आहेत. उपांत्य फेरीतील पहिला सामना दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान आणि दुसरा सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. 27 जूनला हे दोन्ही सामने पार पडणार आहेत.
गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. गेल्या वेळी 2022 टी-20 विश्वचषकात टीम इंडिया इंग्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडली होती. अशा स्थितीत इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत हरवून उपांत्य फेरी गाठण्याच भारताच ध्येय असेल. ज्या मैदानावर भारत-इंग्लंड सेमीफायनल होणार आहे त्या मैदानावरील टीम इंडियाच्या रेकॉर्डबद्दल आपण जाणून घेऊया….
प्रॉव्हिडन्स स्टेडियममध्ये भारताचा रेकॉर्ड कसं आहे?
सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स (Providence Stadium or Guyana National Stadium) स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावरील टीम इंडियाच्या विक्रमा (Record) बद्दल बोलायचे झाले तर, गयानामध्ये भारताने 3 सामने खेळले आहेत. त्यापैकी संघाने 2 जिंकले आहेत आणि फक्त एकमध्ये पराभव झाला आहे. इंग्लंडने या मैदानावर 2 टी-20 सामने खेळले, एकात त्यांना वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला, तर दुसरा सामना अनिर्णित राहिला.
(IND vs ENG Head to Head) : भारत विरुद्ध इंग्लंड हेड टू हेड…
इंग्लंड क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत भारताचा 10 गडी राखून पराभव करून स्पर्धेतून भारताला बाहेर काढले होते. पुन्हा एकदा उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येतील. विक्रमांबद्दल बोलायचे झाले तर, टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात 4 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत.
जर आपण टी-20 रेकॉर्डबद्दल बोललो तर, दोन्ही संघांमध्ये एकूण 23 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 12 आणि इंग्लंडने 11 जिंकले आहेत.
27 जून रोजी होणार लढत…
टी-20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना अफगाणिस्तान-दक्षिण आफ्रिका (SA vs AFG) यांच्यात आणि दुसरा उपांत्य सामना भारत-इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दोन्ही सामने 27 जूनला होतील. पहिला सामना सकाळी सहा वाजता सुरू होईल. तर दुसरा सामना रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.