T20 World Cup 2024 (Super 8, AFG vs BAN) :- अफगाणिस्तानने बांगलादेशचा पराभव केला. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार 8 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर या विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे सेमीफायनल खेळण्याचे स्वप्न भंगले. मात्र, यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या खिलाडूवृत्तीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. तसेच अफगाणिस्तानचा खेळाडू गुलबदिन नईब आणि प्रशिक्षक जॉनाथन ट्रॉट यांच्यावर अप्रामाणिकपणाचे (बेईमानी) आरोप होत आहेत. गुलबदिन नईब (Gulbadin Naib) आणि जॉनाथन ट्रॉट (coach Jonathan Trott) सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. नेमकं प्रत्यक्षात काय घडले? याविषयीचे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया …
नेमंक काय आहे प्रकरण…
बांगलादेशच्या डावाचे 12 वे षटक सुरू होते. दरम्यान, पाऊस पडणार यांचा अंदाज येताच अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी आपल्या खेळाडूंना हातवारे करत ‘पाऊस येतोय सावकाश खेळा,हळूहळू खेळा..’असा इशारा केला. यानंतर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गुलबदिन नईबवर लक्ष केंद्रित झाले आणि स्पिपमध्ये नीट उभा असलेला गुलबदीन नईब अचानक मैदानात झोपला, त्याच्या पायात क्रॅम्प आल्याचे त्याने सांगितले. असे वाटले; जणू त्याला असह्य वेदना होत होत्या. यानंतर नवीन उल हक आणि सपोर्ट स्टाफच्या मदतीने त्याने मैदान सोडले. त्याच्या जागी नजीबुल्ला झद्रान बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला. गुलबदिन ज्या पद्धतीने मैदानावर पडला होता, ते पाहता प्रशिक्षकाच्या सूचनेनंतरच त्याने असे वर्तन केले होते, असे वाटत होते. त्यादरम्यान, आणखी एक-दोन चेंडू टाकले गेले असते आणि फलंदाजाने चौकार मारला असता आणि पावसामुळे खेळ थांबला असता तर त्यावेळी बांगलादेश अफगाणिस्तानच्या पुढे असता आणि त्यामुळे अफगाणिस्तानचे समीकरण बिघडण्याची शक्यता होती.
OMG this is next level acting from AFG 🤐 #AFGvBAN pic.twitter.com/j3IZeNwE0j
— Aussies Army🏏🦘 (@AussiesArmy) June 25, 2024
नईबने मैदान सोडले त्यानंतर पाऊस सुरू झाला तेव्हा बांगलादेशनं 7 बाद 81 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती आणि पावसामुळे सामना पूर्ण झाला नसता तर डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानने सामना जिंकून थेट उपांत्य फेरी गाठली असती. गुलबद्दीन नईब मैदानातून बाहेर पडताच पाऊस आला आणि पावसामुळे सामन्यातील एक षटक कमी करण्यात आले. त्यानंतर बांगलादेश संघाला विजयासाठी 19 षटकांत 114 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र गुलबदिन मैदानाबाहेर गेल्याने कर्णधार राशिद खान आनंदी दिसला नाही. विशेष बाब म्हणजे गुलबदिन नईब 25 मिनिटानंतर म्हणजेच 13व्या षटकात मैदानावर परतला आणि 15वे षटकही टाकले. या षटकात त्याने तंजीम हसनची विकेट घेतली. आणि त्यानंतर एक अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला, जो अफगाणिस्तानने आठ धावांनी जिंकला. आणि 2024 च्या T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तसेच त्याचवेळी सामन्यातील विजयानंतर गुलबदिन नायब नवीन उल हकसोबत धावत येऊन आंनदोत्सव करताना दिसला.
OMG this is next level acting from AFG 🤐 #AFGvBAN pic.twitter.com/j3IZeNwE0j
— Aussies Army🏏🦘 (@AussiesArmy) June 25, 2024
दरम्यान, गुलबदीनने मुख्य प्रशिक्षकाचा इशारा पाहिला होता आणि वेळ काढण्यासाठी त्याने ही युक्ती वापरली, असा तर्क लावला जात आहे. तसेच अनेक जण गुलबदीन याने केलेले हे कृत्य नाटक होते असे अनेकजण म्हणत आहेत. गुलबदीनच्या या नाटक केलेल्या दुखापतीच्या अनेक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानच्या विजयानंतर आता दोघांच्या खिलाडूवृत्तीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, सोशल मीडियावरील यूझर (क्रिकेटचाहते)असा आरोप करत आहेत की गुलबदीन नईबने डीएलएसनुसार (डकवर्थ लुईस नियमानुसार) बांगलादेशचा विजय रोखण्यासाठी हे केले, जे खेळाच्या भावनेच्या विरोधात आहे.
तसेच गुलबदिनचे जमिनीवर पडण्याचे कृत्य पाहून बांगलादेशचा खेळाडू लिटन दासलाही हसू अनावर झाले होते. त्याचवेळी सामन्यातील विजयानंतर गुलबदिन नायब नवीन उल हकसोबत धावत येऊन आंनदोत्सव करताना दिसला. त्याला धावताना पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट करायला सुरुवात केली की त्याने काय अप्रतिम अभिनय केला आहे.
समालोचन करताना सायमन डूल म्हणाले की, ‘प्रशिक्षक खेळ संथ गतीने करण्याचा संदेश देत आहेत आणि अचानक पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला खेळाडू कोणत्याही कारणाशिवाय खाली पडला, हे अस्वीकार्य आहे.’ तर झिम्बाब्वेचे समालोचक पॉमी एमबांगवा याने म्हटले की, ‘ याला या अॅक्टिगंसाठी ऑस्कर किंवा ग्रॅमी पुरस्कार दिला पाहिजे.’ न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक इयान स्मिथने लिहिले की, ‘गेल्या सहा महिन्यांपासून मला गुडघेदुखीचा त्रास होत आहे. आता सामना संपल्यानंतर मी थेट गुलबद्दीन नईब या डॉक्टरकडे जाईन. सध्या तो जगातील आठवे आश्चर्य आहे.