T20 World Cup 2024 (IND vs SA Final) : विश्वचषक 2024 चा अंतिम सामना 29 जून 2024 रोजी खेळला गेला. बार्बाडोस ब्रिज टाऊन केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आमनेसामने होते. अंतिम सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात चांगली झाली नाही.
पण नंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर आणले. यानंतर हार्दिक पांड्याने हेन्रिक क्लासेनची अत्यंत आवश्यक विकेट घेतली. पण सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला तो डेव्हिड मिलरचा झेल जो सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अप्रतिमपणे झेलला.
सूर्यकुमारने झेल घेत फिरवले सामन्याचे चित्र…
बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या शानदार 76 धावा आणि अक्षर पटेलच्या शानदार 47 धावांच्या जोरावर टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 176 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही.
संघाला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. यानंतर हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी शानदार फलंदाजी करत टीम इंडियाकडून सामना जवळपास हिसकावून घेतला होता. दरम्यान, हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत हेनरिक क्लासेनला पंतकरवी झेलबाद केले. पण डेव्हिड मिलर अजूनही क्रीजवर उपस्थित होता.
शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. हार्दिक पंड्याने फुल टॉस चेंडू टाकला, मिलरने त्याची बॅट जोरात फिरवली आणि चेंडू हवेत सीमारेषेकडे गेला. दरम्यान, सूर्यकुमार यादवने धावत येऊन चेंडू पकडला. पण तो सीमारेषेला स्पर्श करणार होता. त्यामुळे त्याने चेंडू हवेत फेकला आणि नंतर सीमारेषेत प्रवेश केला. त्यानंतर तो बाहेर आला आणि झेप घेत हवेतील चेंडू झेलला आणि हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
जर त्या झेल ऐवजी षटकार मिळाला असता. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकू शकला असता आणि टीम इंडियाचे विजेतेपदाचे स्वप्न भंग पावले असते.